अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी दारुच्या नशेत असताना मतीमंद असलेल्या निरपराध व्यक्तीला अमानुष पणे मारहाण केल्याने चवताळून तरुणांनी त्या कर्मचाऱ्यांना बेदम चोप दिला. जमावाचा रुद्र अवतार पाहून या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.
हे कर्मचारी निघून जात असताना तरुणांनी त्यांच्या खाजगी गाडीच्या काचा फोडल्या.राज्य उत्पादन शुल्काच्या एका हि कर्मचाऱ्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली नसल्याने ते खरंच राज्य उत्पादन शुल्काचे कर्मचारी होते का?
असा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत माहिती मिळताच राहुरीचे प्रभारी पोलीस निरीक्षक साळवे यांनी आपली पोलीस कुमक तातडीने घटनास्थळी पाठवली मात्र ते राज्य उत्पादन शुल्काचे कर्मचारी घटनास्थळा वरून निघून गेले होते.
देवळाली प्रवरा येथे शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कचे दोन कर्मचारी खासगी वाहनातून आले नगर पालिकेच्या पाठीमागिल बाजुस थांबले असताना तेथे मतिमंद मुलगा उभा असताना त्यास मारहाण करण्यास सुरवात केली.
लाकडी काठीच्या सहाय्याने मारहाण करीत असताना उपस्थित तरुणांनी तुम्हाला मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला?हे कर्मचारी अधिकृत गणवेश घालून न येता सिव्हिल ड्रेस वर कशासाठी आले होते? अशी विचारणा केली असता ते दोन कर्मचारी दारुच्या नशेत नको त्या शब्दात बोलू लागले उपस्थित तरुणांनी मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांस बेदम मारहाण केली.
मारहाण झाल्यानंतर संबधित कर्मचारी पोलिस ठाण्यात न जाता कुठे गेले?याचा थांगपत्ता लागला नाही.हे कर्मचारी खरंच दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाचे होते की तोतया होते? ते दोन्ही कर्मचारी नशेत असल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्काच्या कर्मचाऱ्यांस भर रस्त्यात मार खावा लागला ही बाब अत्यंत गंभीर असताना ? त्या दोन कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल का केला नाही. असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहे. या घटनेमुळे लोकांचे मनोधैर्य वाढून इतर शासकीय कर्मचारी, पोलीस खात्याला याची किंमत मोजावी लागू शकते.
त्यामुळे राज्य उत्पादन शुल्काच्या त्या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई होणे अभिप्रेत आहे. दरम्यान शनिवारी सकाळी दारूबंदी व उत्पादन शुल्क च्या पथकाने देवळाली प्रवरा येथे अवैध दारू व्यवसायवर छापेमारी केली मग हे दोन कर्मचारी त्या पथकातील होते का?
हे दोघेजण खरच दारूबंदी शुल्क विभागाचे होते का तोतया होते असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे.काही प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा व्हिडीओ काढल्याने ते कर्मचारी व त्यांची खासगी गाडी त्या व्हिडीओ मध्ये दिसून आली आहे.