अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- उंदीराने डोळे कुरतडल्याने रेल्वे कर्मचारी सुरेश साळवे याला रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. अति मद्यसेवानामुळे त्यांचे लिव्हर डॅमेज झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात सांगितले आहे.
मात्र उंदराने डोळा कुरतडल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसल्याने त्यांठिकाणी उंदराचा सुळसुळाट आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त असून तातडीने परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी केली आहे.
डोंबिवली पूर्व ठाकूर्ली परिसरात सुरेश साळवे त्यांची पत्नी आणि तीन मुलांसोबत रेल्वे कॉलनीत राहतात. सुरेश रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये खलाशी म्हणून कामाला होते. बुधवारी ते झोपेत असताना उंदीराने त्यांचे डोळे कुरतडले. तसेच त्यांची नखे खाल्ली होती.
सकाळच्या सुमारास सुरेश रक्तबंबाळ झाल्याचे दिसल्याने कुटुंबियांनी त्यांना कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अति मद्यसेवनामुळे त्यांचे लिव्हरवर उपचार सुरु होते.
काही दिवसापूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा डोळा आणि नखे उंदराने कुरतडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.