खळबळजनक ! डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवले विषाचे पाकीट; हत्येचे षडयंत्र?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने आलेले

विषाने भरलेले एक पाकीट व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच जप्त केले आहे. यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांच्या हत्येचे षडयंत्र रचले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ते कोणी पाठवले व यामागे अमेरिकेतील कोणी व्यक्ती आहे का, याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच नावाने हे पार्सल पाठवले गेले आहे.

या पार्सलबाबत संशय येताच व्हाईट हाऊसच्या प्रवेशद्वारावरील पोलिसांनी ते जप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पार्सलमध्ये ‘रिसीन’ नावाचे अत्यंत घातक विष आहे.

त्याची पुष्टी करण्यासाठी दोन चाचण्या करण्यात आल्या आहेत. हे पार्सल कॅनडातून आल्याचा दाट संशय आहे. त्याच अनुषंगाने ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन’ (एफबीआय),

सिक्रेट सर्व्हिस तसेच अमेरिकन पोस्टल इन्स्पेक्शन सर्व्हिस या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तरित्या तपास सुरू केला आहे. दरम्यान, अमेरिकेतील जनतेच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचे एफबीआयच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केले.

पार्सलमध्ये सापडलेल्या ‘रिसीन’ विषाचा दहशतवादी हल्ल्यासाठी वापर केला जातो. पावडर, मिस्ट किंवा ऑसिडच्या रुपात त्याचा उपयोग केला जातो.

हे विष खाल्ल्याने व्यक्तीला उलटय़ा, पोट आणि आतडय़ातून प्रचंड रक्तस्राव सुरू होतो. तसेच लिव्हर आणि किडनी निकामी होऊन व्यक्तीचा मृत्यू होतो.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24