खळबळजनक ! रेल्वे रुळावर आढळून आला तरुणाचा मृतदेह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक 2 मधून जाणार्‍या रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

दरम्यान हा मृतदेह कोणाचा आहे ? याबाबतची ओळख पटविण्याचे काम उशिरा रात्रीपर्यंत सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे जम्मू-तावी एक्सप्रेसखाली रेल्वे लाईन क्रॉस करीत असताना हा तरुण सापडून त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.

संबंधित तरुण हा अंदाजे 20 वर्ष वयाचा आहे. मयत तरुणाचे वर्णन मयत तरुणाची उंची 5 फूट असून बांधा सडपातळ आहे. चेहरा लांबट, केस वाढलेले असून त्याचा रंग गोरा आहे.

उजव्या हाताच्या पंजावर क्रॉस व बदामाचे चिन्ह गोंदवलेले आहे. अंगात फूल बाह्याचा पांढरा टी शर्ट व जीन्स पॅन्ट पायात सँडल अशा पेहरावात तो आढळून आला आहे.

दरम्यान, सदर अनोळखी व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन वाय. ए. पठाण यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24