अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांच्याविषयी सोशलमिडीयावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिध्द करणार्यांविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संबंधीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी फिर्याद दाखल केली होती. तक्रारीत कतारी यांनी म्हटले आहे की, भाजपचे पदाधिकारी दीपक भगत व इतर सहाजणांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविषयी सोशलमिडीयावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिध्द केला आहे.
त्यांचे बनावट छायाचित्रे बनवून नियमांचे उल्लंघन करणे, तसेच त्याद्वारे बदनामीकारक संदेश दिल्या कारणाने सायबर डीफेमेशन नियमांचे उल्लंघन झालेले आहे.
हा प्रकार करणाऱ्यांमध्ये सहभागी असलेले काहीजण हे विद्यार्थी असल्या कारणाने त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर कारवाई होवून त्यांचे शैक्षणिक नुकसान व्हावे अशी आमची इच्छा आहे.
मात्र त्यांना कडक शब्दात समज देण्यात यावी. इतर विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तात्काळ सायबर अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.