मिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सापडली ‘एक्सपायर’ झालेली औषधी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- मिरी (ता. पाथर्डी)प्राथमिक आरोग्य कंेद्रात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अिधकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी घेतलेल्या झाडाझडतीत मुदतबाह्य औषधे आढळून आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत कोरोना बाबतचा आढावा घेतला.

त्यानंतर त्यांनी जेथे औषधांचा स्टॉक होता त्याची पाहणी करत असताना रक्तपातळ करण्याच्या क्लोपीडोग्रेल या औषधाची पाहणी केली.

त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, हे औषध ‘एक्सपायर’ झालेले आहे दोन महिन्यापूर्वीच या औषधाची मुदत संपलेली आहे.

त्यांनी ते गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. गाडे यांना दाखवत तुमचे लक्ष आहे का मुदतबाह्य औषधे रुग्णालयात ठेवताच कशी, असे म्हणत दोघांनाही धारेवर धरले.

या प्रकाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कोणावर आणि काय कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले अाहे..

अहमदनगर लाईव्ह 24