शिवप्रतिष्ठानमधून नितीन चौगुले यांची हकालपट्टी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-  प्रखर हिंदुत्ववादी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेमध्ये मोठी खळबळ माजली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी कार्यवाहक नितीन चौगुले यांची शिवप्रतिष्ठान संघटनेतून हकालपट्टी केली आहे.

त्यांनी ही घोषणा एका व्हिडिओ मार्फत केलेली आहे. दरम्यान, शिवप्रतिष्ठानमधील अनेक दिवस खदखदत असलेला वाद यानिमित्ताने समोर आला असून याची परिणीती संघटनेच्या फुटीत होणार काय? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी एक व्हिडीओ शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पाठवून कार्यवाहक नितीन चौगुले यांना पदावरुन हटवण्यात आले असून त्यांच्याशी संघटनेविषयी संबंध ठेवू नये, असे त्रोटक निवेदन त्यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24