कोविड रुग्णांच्या टेस्टींग करण्याच्या वेळा वाढवा : माजी आमदार स्नेहलता कोल्हे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयामध्ये विविध टेस्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परंतु टेस्ट करण्याच्या वेळा मर्यादीत असल्याने संशयीत रुग्ण टेस्ट करण्यापासून वंचित राहतात.

दुसऱ्या दिवसाची वाट पाहण्यापर्यंत अनेकांच्या संपर्कात येऊन संसर्ग पसरला जातो. त्यामुळे टेस्ट करण्याच्या वेळा वाढवण्यात याव्या.

तसेच एचआरसीटी करण्यासाठी आकारण्यात येणारी तपासणी फिची रक्कम जास्त असून चाचणी वारंवार करावी लागत असल्याने आर्थिक स्थितीही कोलमडत आहे.

त्यामुळे रुग्णांना तपासणी कमी दरामध्ये उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे केली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवलेल्या निवदेनात कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, सध्या कोविड रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून रॅपिड टेस्ट करण्यासाठी गर्दी वाढत आहे. रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या या टेस्टच्या वेळा मर्यादित ठेवण्यात आलेल्या आहे.

त्यामुळे रांगेत उभे राहुन टेस्ट न झाल्यामुळे वंंचित राहतात. टेस्टसाठी दुसऱ्या दिवसाची वाट पहात घरी थांबतात, असे अनेक रुग्ण असल्याने ते इतरांच्या संपर्कात येऊन कोरोनाचा संसर्ग वाढत जातो. त्यामुळे या तपासणीच्या वेळेमध्ये वाढ करण्याची गरज आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24