एसबीआयमध्ये जमा पैशांवर मिळेल एक्स्ट्रा व्याज; 31 मार्चपर्यंत घ्या ‘हा’ स्कीमचा लाभ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) पैसे जमा करण्यावर अतिरिक्त व्याज देखील मिळते. हे व्याज एखाद्या विशिष्ट वर्गाला मिळते. चला एसबीआयच्या योजनेबद्दल जाणून घेऊया.

एसबीआय योजना :- एसबीआयच्या या योजनेचे नाव आहे SBI We Care. ही विशेष मुदत ठेव योजना मार्च 2021 पर्यंत आहे. एसबीआयने मे 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू केली.

याअंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना रिटेल डिपॉजिच्या बाबतीत 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जादा अवधीसाठी व्याज दरावर 0.30 टक्के जादा व्याज दिले जात आहे.

एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 0.50 टक्के अधिक व्याज देते. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना हे 0.50 टक्के आणि अतिरिक्त 0.30 टक्के व्याज दर जोडून अतिरिक्त व्याज मिळू शकते.

गृह कर्जाचा व्यवसाय 5 लाख कोटी रुपयांहून अधिक :- एसबीआयने बुधवारी सांगितले की, गृह कर्ज व्यवसायाने 5 लाख कोटींचा आकडा ओलांडला आहे.

बँकेच्या रिअल इस्टेट आणि गृहनिर्माण व्यवसाय युनिटमध्ये गेल्या 10 वर्षात पाच पट वाढ झाली आहे. 2011 मध्ये युनिटच्या व्यवस्थापनातील मालमत्ता 9,000 कोटी रुपये होती,

जी 2021 मध्ये वाढून 5 लाख कोटी रुपये झाली आहे. 2004 मध्ये बँकेने गृह कर्जाच्या व्यवसायात प्रवेश केला. त्यावेळी एकूण पोर्टफोलिओ 17,000 कोटी रुपये होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24