दहावी, बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल – मे महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

40 ते 100 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटांचा वेळ वाढवणार आहे. तर 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवणार आहे.

हे सुधारित वेळापत्रक www.mahasscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

परीक्षेच्या एक ते दीड तास आधी केंद्रावर हजर राहा, असे कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांचं थर्मल स्क्रीनिंग होणार आहे.

मास्क, पाण्याची बाटली, स्वत:चं लेखन साहित्य वापरणं बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सकाळ सत्रात 10.30 वाजता तर दुपारच्या सत्रात 3.00 वाजता सुरू होणार आहेत.

परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या 1 ते दीड तास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदा लेखी परीक्षेचा वेळ अर्ध्या तासाने वाढवून देण्यात आला आहे.

कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

तापमान तपासल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याआधी किमान 30 मिनिटं आधी बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी उपस्थित असावे, अशा सूचना शिक्षण मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24