राज्यातील पावसाबाबत अत्यंत महत्वाची बातमी; जाणून घ्या पावसाची स्थिती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  जून महिना कोरडा कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातपावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक ठिकाणी धरणे भरली तर नद्या नाल्यांना पूर आला आहे. यातच आगामी पावसाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

राज्यातील काही भागात 28 तारखेपर्यंत पाऊस घेणार विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाला मिळणार दिलासा मिळणार आहे. मात्र, कोकण, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. तर मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती निर्माण झाली.

पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती.

गेल्या आठवड्याभरापासून दाणादाण उडवलेल्या पाऊस राज्यातील काही भागात विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. येत्या 28 जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पूरग्रस्त भागाला दिलासा मिळणार आहे. मात्र कोकण, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24