अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- सन.2021-22 मध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा CET लागू करण्यात आलेली होती. शासन निर्णय दि.11/08/2021 अन्वये सदर सामाईक प्रवेश परीक्षा CET रद्द करण्यात आलेली आहे.
तसेच रिट याचिका क्र.1413/2021 मध्ये मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे इ.11वी ची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबत निदेश आहेत. त्यानुसार राज्यातील इ.11वी प्रवेशाची कार्यवाही सुरू करण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
सन.२०२१-२२ मध्ये राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.११वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत.
सदर ५ ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. उक्त पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.११वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते.
न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणेसाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा दि.14 ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापूढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.