अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे म्युकोरमायकोसिस या आजाराचे संकट दिवसेंदिवस धोका वाढत आहे. कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत आहे.
खरे तर, अशा प्रकारचा संसर्ग कोरोना पूर्वीही आढळून येत असे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र, आता कोरोनामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फोफावताना दिसत आहे.
गंभीर रुग्णांना पुरविण्यात आलेल्या ऑक्सिजन दर्जाहीन असल्याने काळ्या बुरशीचा आजार पसरला असल्याचा आरोप होत आहे. ऑक्सिजन गुणवत्तेची तपासणी व्हावी अशी मागणी देखील होत आहे. ब्लॅक फंगस किंवा म्यूकोर्मिकोसिसमुळं महाराष्ट्रात 90 मृत्यू झालेत.
आपल्याकडून दूषित ऑक्सिजनचा तर वापर होत नाही ना? असा प्रश्न आता अन्न व औषध फाउंडेशन आणि तज्ज्ञांनी उपस्थित केलाय. डिस्टिल्ड वॉटरऐवजी नळाचे पाणी तर वापरले जात नाही? कारण, यामुळं काळ्या बुरशीचे प्रमाणही वाढते असं दिसून आलंय.
भारत आणि महाराष्ट्रात ज्या कोरोना स्ट्रेनचा प्रादुर्भाव झालाय, तोही ब्लॅक फंगसला कारणीभूत असू शकतो. मात्र, ऑक्सिजन आणि डिस्टिल्ड वॉटरचा वापर न होणं हीदेखील कारणं आहेतच. ही बुरशी हवा, ओलसर ठिकाणी, माती, ओलसर खोल्यांमध्ये आढळते.
निरोगी लोकांना विशेष काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांना काळ्या बुरशीचा धोका अधिक आहे दरम्यान काळ्या बुरशीचा (म्युकोरमायकोसिस) आजार साथरोग नियमावलीत घेण्यात आला आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढ वाढली असताना अशा रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने इंडस्ट्रियल ऑक्सिजन उत्पादकांना ऑक्सिजन निर्मित करण्याचे सांगण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीत करण्यात आली.
त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीत गुणवत्ता राहिली नसावी. त्यामुळे ऑक्सिजनची लॅब टेस्ट करावी अशी मागणी ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे.