अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- अमेरिकेत कोरोना विषाणूची सात नवीन स्वरूपे आढळली. ही नवीन स्वरूपे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्वरूपाशी मिळत्याजुळत्या रूपात तयार होत आहे.
एका संशोधनाच्या आधारावर अमेरिकी संशोधकांनी ही माहिती दिली. ही नवीन स्वरूपे इंग्लंडसारखी सांसर्गिक असेल का याबाबत संशोधकांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र, नवीन स्वरूपे जास्त सांसर्गिक असू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
लुसियाना स्टेट विद्यापीठाचे विषाणू शास्त्रज्ञ आणि संशोधनाचे सहलेखक जेरेमी कामिल यांनी सांगितले की, या म्युटेशनमध्ये काहीतरी आहे हे स्पष्ट आहे. मात्र नवीन स्वरूपे पेशीत कशी प्रवेश करतात याबाबत शास्त्रज्ञांना शंका आहे.