अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- पुण्यातील एका तरुणास फेसबुकची मैत्रीण एकाला चांगलीच महागात पडली असून, फेसबुकद्वारे न्यूड कॉल करण्यास सांगितल्यानंतर त्याचे रेकॉर्डिंग केले आणि रेकॉर्ड केलेला न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत साडे पाच लाख रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.
याप्रकरणी ३५ वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, झिनत शर्मा नावाच्या फेसबुक धारक तरूणी व इतरांवर खंडणी, फसवणूकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धानोरीतील उच्चभ्रू परिसरात राहतात.
त्यांचे फेसबुकवर खाते आहे. त्यांना मे महिन्यात या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती स्विकारल्यानंतर त्या मुलीने त्यांना मॅसेंजरवर चाट करण्यास सुरूवात केली. दोघेही चाटवर बोलले. त्यात त्यांची मैत्रि झाली. तिने तक्ररादारांना फेसबुकद्वारे न्यूड कॉल करण्यास सांगितले.
न्यूड कॉल केल्यानंतर स्क्रिन रेकॉडिंगकरून घेतले. तसेच, तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना हा व्हिडीओ डिलीट करण्यासाठी साडे पाच लाख रुपये मागितले.
तक्रारदारांनी बदनामी पोटी त्यांना पैसे दिले. परंतु, आणखी पैसे मागण्यास सुरूवात झाल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, प्राथमिक चौकशीकरून हा गुन्हा दाखल केला आहे.