ताज्या बातम्या

ब्रेकिंग : फडणवीस, शिंदे यांचा आज सायंकाळी सात वाजता शपथविधी

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra news : अपेक्षेप्रमाणे भाजपने शिवसेनेतील शिंदे गटाच्या मदतीने नवे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्यपालांना देण्यात येत आहे.

राजपालांनी तो मंजूर केला की आज सायंकाळीच ७ वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राजभवनातील ‘दरबार हॉल’मध्ये शपथविधी सोहळा होणार आहे.

मुंबई आलेल्या एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते दोघे राजभवानावर राज्यपालांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात त्यांची भेट घेणार असून त्यानंतर दोघेही संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.

Ahmednagarlive24 Office