Maharashtra Politics : राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना आपण लोकायुक्तसाठी उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी फडणवीस यांनी कायदा करण्यासंदर्भात आश्वासन दिल्याने उपोषण सोडले. त्यानंतर राज्यात आघाडीचे सरकार आले त्यांनी ही लेखी आश्वासन दिले.
मात्र, लोकायुक्त कायादा झाला नाही. आता नवे सरकार आले असून त्यामध्ये फडणवीस यांचा समावेश आहे, त्यामुळे आता लोकायुक्ती मार्गी लागेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. ‘लोकपाल कायदा २०१३’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन हजारे यांच्या हस्ते राळेगणसिध्दी येथे करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते. हजारे यांनी लोकपाल कायदाच्या वाटचालीचा आढावा घेतला. राज्यातील लोकायुक्तसंबंधी ते म्हणाले, भ्रष्टाचार निर्मूलनाचा दृष्टीने हा महत्वपूर्ण व क्रांतिकारक कायदा आहे. काही लोकांना हा कायदा नको होता. परंतु जनशक्तीचा दबावामुळे संसदेला हा कायदा करावा लागला.
लोकपाल हा केंद्रासाठी तर लोकायुक्त हे राज्यासाठी आहे. देशभरात तामिळनाडू, उत्तराखंड अशा दोन तीन राज्यात लोकायुक्तची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र अद्याप लोकायुक्तची अंमलबजावणी झालेली नाही.
आता राज्यात पुन्हा सत्तांतर झालेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा करण्याबाबत आश्वासन दिले होते. ते आता सरकार मध्ये आहेत. त्यामुळे लवकरच राज्यात लोकायुक्तची अंमलबजावणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.