श्रीराम मंदिराच्या निधी संकलनावरून फडणवीसांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-उत्तरप्रदेशमधील अयोध्येत निर्माण होत असलेले श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित हिंदुत्ववादी संघटनांनी निधी संकलनास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर टीका केली होती. तर, आज (4 मार्च) पुन्हा एकदा काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला.

यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधार्यानावर चांगलीच टीका केली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ,रामजन्मभूमी अयोध्येमध्ये रामलल्लाचं भव्य मंदिर उभं राहतंय.

मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टनं जगभरातील रामभक्तांकडून देणगी स्वरुपात मदत गोळा करण्यासाठी मोठं अभियान राबवलं.

१५ जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियाला प्रचंड मोठं यश मिळाल्याचं दिसतंय. समाजाच्या सर्व वर्गातल्या, सर्व जाती-धर्मांच्या राम भक्त भरभरून देणगी देत आहे.

हे या राज्यातील नेत्यांना दिसत नाही. त्यांना खंडणी गोळा करण्याची सवय आहे त्यामुळे निधी समर्पण काय असतं हे त्यांना कळणार नाही असं म्हणत टोला लगावला.

विधानसभेत कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी राम मंदिराच्या निधी संकलनावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24