अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पुढील दहा वर्षे तरी पाहू नयेत,असा सल्ला दिला आहे.
ते पुढील साडेतीन वर्ष नव्हे तर दहा वर्षात देखील महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू शकणार नाहीत, असा टोला लगावला. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने फडणवीस यांची गोव्यात जास्त आवश्यकता आहे.
त्यांना गोव्याच्या टास्क फोर्सचा अध्यक्ष करण्यात यावे असेही मुश्रीफ म्हणाले.ते कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर राज्यात भाजपच्या नेत्यांना प्रत्युत्तर देण्यात अग्रेसर असणारे दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणजे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे नेहमी आघाडीवर असतात.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असल्याने मंत्री मुश्रीफ हे कोल्हापुरात असले काय किंवा मुंबईत असले काय भाजपा नेत्यांवर कडाडून हल्ला चढवतात.त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच गुजरातचा दौरा केला.परंतु त्यांनी कोकण आणि केरळचासुद्धा हवाई दौरा करणं अपेक्षित होते.पंतप्रधान हे केवळ गुजरातचे नाहीत ते संपूर्ण देशाचे आहेत. पण ते तसे वागताना दिसत नाहीत.