अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- पॅन-आधार लिंक करण्याची आयकर विभागाने निश्चित केलेली शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. तुम्ही बुधवारपर्यंत 31 मार्च लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्द तर होईलच, पण आयकर कायद्यानुसार 10 हजार रुपयांपर्यंत दंड बसू शकतो.
आयकर विभागाच्या वेबसाईटवरून पॅन-आधार लिंक करा -सर्वात पहिले आयकर विभागाच्या वेबसाईटवर जावे, आधारकार्डवर असलेले नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर एंटर करा, त्यानंतर कॅप्चा कोड एंटर कर, त्यानंतर लिंक आधार बटनावर क्लिक करा,
त्यानंतर तुमचे पॅन आधारशी लिंक होईल. SMS पाठवून पॅन-आधार लिंक करा यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर UIDPAN टाईप करून त्यानंतर 12 अंकांचा आधार नंबर लिहा. त्यानंतर 10 अंकांचा पॅन नंबर लिहा.
त्यानंतर 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. केंद्र सरकारने याआधी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यात उशीर करणाऱ्यास 1000 रुपये लेट फीस चार्ज केली होती. नवीन सेक्शन 234H फायनान्स बिल, लोकसभेत मंजुरीसाठी आले होते.
यानुसार, या दोन्ही डॉक्यूमेंट्सला लिंक न केल्यास 10हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. हे लेट फी एक निष्क्रिय पॅन कार्ड लावण्यात येत असलेली पेनल्टी पेक्षा वेगळी असणार आहे.