अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- सैन्यदलातील नोकरीसाठी बनावट दाखले तयार करून सैन्य दलाची फसवणूक करणाऱ्या पाथर्डीतील एका शैक्षणिक संस्थाविरुद्ध पोलिस व नाशिक येथील मिलिटरी इन्टिलिजन्सने संयुक्त कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील नाथनगरमध्ये काहीजण हे बनावट शाळेची कागदपत्र तयार करून त्या मोबदल्यात पैसे स्वीकारून, बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने काही युवक सरकारी व सैन्यदलात नोकऱ्या हस्तगत करीत असल्याची माहिती मिळाली होती.
त्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व मिलिटरी इंटेलीजेंस देवळाली कॅम्प (नाशिक) यांनी केलेल्या संयुक्त कारवाई करत ४ आरोपी,
बनावट शाळेची कागदपत्र तयार करून त्या मोबदल्यात पैसे स्वीकारून ते देण्याचे काम करत आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या धडक कारवाई मुळे या भागात चांगलीच खळबळ उडाली आहे.