सोन्याच्या किंमतीत घसरण; काय आहे आजचे दर? जाणून घ्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-भारतीय बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. बुधवारी, जून वायदा सोन्याच्या किंमती 0.55 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

सोन्याप्रमाणेच चांदीतही घसरण दिसत आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47,023 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदी 68,140 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.

सोन्याचे नवीन दर :- बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 505 रुपये नोंदली गेली.

राजधानी दिल्ली मध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम 46,518 रुपये झाली आहे. यापूर्वी व्यापार सत्रात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47,023 रुपयांवर बंद झाले होते.

चांदीचे नवीन दर ;- चांदीच्या दरातही आज घसरण झाली. बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीचे दर 828 रुपयांनी घसरून 67,312 रुपयांवर गेले. यापूर्वी व्यापार सत्रात चांदी 68,140 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली होती.

गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत दोन महिन्यांच्या उच्चांकी अर्थात 48,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली होती. जागतिक दरामध्ये घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24