अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- स्कूल ऑफ रॉक’ या चित्रपटात ड्रमर मॅक्गीची भूमिका साकारणारा अभिनेता केविन क्लार्कचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याचा सर्वांना धक्का बसला आहे.
या अभिनेत्याचे वय केवळ ३२ वर्ष होते. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याला श्रद्धांजली वाहत आहे. २६ मे ला शिकागोच्या रस्त्यावर सायकल चालवत असताना एका कारने त्याला धडक दिली. या अपघातता त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार जोरात येऊन धडकल्यामुळे केविनचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिनेता जॅक ब्लॅकने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
जॅक ब्लॅकने इन्स्टाग्राम अकाऊंटवर केविनसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘धक्कादायक बातमी. केविनचे निधन झाले आहे. माझा यावर विश्वासच बसत नाही.. श्रद्धांजली..’
या आशयाचे कॅप्शन जॅकने दिले आहे. केविन आणि जॅकने २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्कूल ऑफ रॉक’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.