अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-पंजाबचे प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सरदुल सिकंदर बर्याच दिवसांपासून आजारी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी सरदूल सिकंदर यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. सरदूल सिकंदर हे एक पंजाबी गायक होते.
1980च्या दशकात सरदूल यांनी आपला पहिला अल्बम “रोडवेज द लारी” जारी केला होता. यानंतर, त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
सरदूल सिकंदर यांनी अनेक हिट गाणी दिली आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची झलक दिली आहे. ऑगस्ट 1961 रोजी त्यांचा जन्म झाला.
सरदूल सिकंदर यांनी “जग्गा डाकुरा” या पंजाबी चित्रपटात आपल्या धमाकेदार अभिनयानं सर्वांना प्रभावित केलं.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही सरदुल सिकंदर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे- “महान पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांच्या निधनाबद्दल कळल्यावर फार वाईट आहे.
नुकतंच तो कोविड 19 चा शिकार झाला होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांविषयी माझे मनःपूर्वक संवेदना.”