अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील एका टेलर दुकानाला आग लागून शिवण्यासाठी आलेली कपडे, शिलाई मशिन व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

जगदंबा मंदिरालगतच्या फेमस टेलर या दुकानाला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कुळधरण येथे जगदंबा मंदिरालगतच्या परिसरात संदीप बोबडे यांच्या मालकीचे फेमस टेलर दुकान आहे. या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे.

दुकानाला भीषण आग लागल्याने सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत शिलाई मशीन, इन्व्हर्टर, टेबल, साड्या व इतर कपडे जळून खाक झाले. तलाठ्याने नुकसानीचा पंचनामा केला आहे.