Vi Recharge Plan : टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन प्लॅन्स सादर करत असते. अशातच आता Vodafone-Idea (Vi) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्लॅन आणले असून याचा ग्राहकांना फायदा होईल.
जर तुम्हाला सर्वोत्तम दैनंदिन डेटा प्लॅन हवा असेल तर तुमच्यासाठी प्लॅन उत्तम आहे. कंपनीच्या या प्लॅनची किंमत 601 रुपये आणि 901 रुपये इतकी आहे. तसेच कंपनी यात दररोज 3 जीबी डेटा देत आहे. शिवाय तुम्हाला 48 GB पर्यंत अतिरिक्त डेटा मोफत दिला जाईल.
901 रुपयांमध्ये मिळतात अनेक फायदे
या प्लॅनची वैधता 70 दिवसांची असून यात तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा मिळेल. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये 48 GB अतिरिक्त डेटा मोफत दिला जात आहे. तसेच यात दररोज 100 मोफत एसएमएस, देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग मिळेल. यात बिंज ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्स मिळेल. प्लॅनच्या सदस्यांना एका वर्षासाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाईलवर मोफत प्रवेश मिळेल. हा प्लॅन Vi चित्रपट आणि टीव्ही अॅपवर विनामूल्य प्रवेश देतो.
कंपनीचा 601 रुपयांचा प्लॅन
यात तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा तसेच 16 GB अतिरिक्त डेटा मोफत दिला जातो. वैधता 28 दिवसांची आहे. दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग मिळेल. या प्लॅनच्या ग्राहकांना कंपनी एका वर्षासाठी Disney + Hotstar मोबाईलचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.
यात बिंज ऑल नाईट बेनिफिट उपलब्ध आहे. यामुळे तुम्ही मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित डेटा वापरू शकता. तुम्हाला प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईट्सचा लाभ मिळेल. त्याशिवाय Data Delights मध्ये कंपनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दर महिन्याला 2 GB पर्यंत बॅकअप देते. Vi movies आणि TV अॅपवर मोफत प्रवेश दिला जाईल.