अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. बिबट्याच्या दहशतीने आधीच नागरिक घाबरले आहे.
यातच बिबट्या खुलेआम नागरिकांना दर्शन देऊ लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. नुकतेच कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
येथील सावळीविहीर रांजणगाव देशमुख रस्त्याच्या बाजूला तुकाराम बाबुराव गुडघे यांच्या उसाच्या शेताजवळ बिबट्या दिसून आला.
बिबट्या वावर या परिसरात असल्याने शेतकऱ्यांनाही आपल्या शेतात जाणे कठीण झाले आहे. बिबट्याला लपण्यासाठी प्रचंड उसाचे शेत असल्याने हा बिबट्या या नागरिकांत घबराट निर्माण करून देत आहे.
या परिसरात अनेक वस्ती असून लोक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असल्याने या बिबट्याच्या धाकाने नागरिकांना पहारा देण्याची वेळ आली आहे.
डाऊच खुर्द, डोराळे नंतर हा बिबट्या पुन्हा एकदा सोनेवाडी परिसरात आढळला. काल पंचकेश्वर शिवारातील सोनेवाडी येथील नागरिकांनी एकत्र येत या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडे मागणी केली आहे.