कांदा करतोय शेतकऱ्यांचा वांधा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात  घसरत असल्याचे पहायला मिळत आहेत. नगरसह सर्वच बाजारांमध्ये कांद्याचे भाव कमी होत आहेत.

गेल्या काही दिवसापूर्वी कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, आता पुन्हा दिवसागणिक ते दर कमी होत आहेत. त्यामुळे बळीराजा चांगला चिंतेत पडला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केट मध्ये शनिवारी कांद्याच्या भावात ३०० रुपयांनी घसरण होऊन जास्तीत जास्त  दोन हजार २०० रुपये दर मिळाले.

तर नगरमध्ये २००० ते २४०० असे दर मिळाले. शनिवारी नगरच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये  ४८ हजार २०८  गोण्यांची कांद्याची आवक झाली.एक नंबर चे कांद्याला दोन हजार ते दोन हजार ४०० रुपये भाव मिळाला.

दोन नंबरला १२००  ते २००० रुपये. गोल्टी कांद्याला ७०० ते १२००  रुपये जोड कांद्याला पाचशे ते सातशे रुपये भाव मिळाला.

प्रचंड कष्ट करून पिकवलेल्या कांद्याला भाव मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग? याशिवाय आता दुसरे करायचे तरी काय असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24