कांद्याचे हजारो किलो बोगस बी विकून शेतकऱ्यांची फसवणूक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- नगदी उत्पन्न मिळवून देणार पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. मात्र तालुक्यात कांद्याचे हजारो किलो बोगस बी उत्पादक कंपन्या व दुकानदारांनी विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली.

दोषींवर तातडीने कठोर कारवाई करा, अशी मागणी घुलेवाडीचे प्रगतशील शेतकरी भास्करराव पानसरे यांनी केली. पानसरे म्हणाले, शेतकरी मोठ्या कष्टाने शेती पिकवतो. कांदा शाश्वत पैसे देणारे पीक आहे.

यंदा चांगला पाऊस व मुबलक पाणी असल्याने शेतकरी वर्ग कांदा पिकाकडे वळला. हा अंदाज पाहून अनेक कंपन्या व दुकानदारांनी कांद्याचे बनावट बी शेतकऱ्यांना विकले.

यामुळे हजारो शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली. शेतीची मशागत करुन महागड्या किमतीचे बी पेरले. मात्र डोंगळे पिकले. यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले.

आधीच कोरोना व नैसर्गिक आपत्तीमुळे शेत मालाला बाजार भाव नसल्याने मेटाकुटीस आलेल्या शेतकरी वर्ग बोगस बियाणांमुळे अधिक अडचणीत सापडला आहे. फसवणूक करणाऱ्या कंपन्या व दुकानदारांवर कठोर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पानसरे यांनी दिला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24