पुणेकरांच्या खोडसाळपणामुळे शेतकऱ्यांची पिके आली धोक्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-गेल्या महिनाभरापासून पिंपळगाव जोगा धरणाच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.

पारनेर तालुक्यातील अळकुटीसह १२ ते १३ गावांना एक थेंबही मिळाला नाही. पाणी टंचाई निर्माण होण्यास पुणेकर कारणीभूत आहे, असे वक्तव्य रांधे‌ गावचे उपसरपंच संतोष काटे यांनी केले आहे.

रांधे‌ गावचे उपसरपंच संतोष काटे म्हणाले, या आर्वतनातुन पाणी मिळाले नसल्याने या १२ ते १३ गावांतील फळबागा जगविण्यासाठी तरी हे‌ आवर्तन गरजेचे आहे.

पिंपळगाव जोगा धरणातून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हद्दीवर असणा-या गावांनी परस्पर पाणी वळवून घेतल्याने पारनेर तालुक्यातील गावांना या आर्वतनातून १२ गावांना पाणी मिळाले नाही.

यामुळे पाणीटंचाई निर्माण होणार आहे. तसेच यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. या धरणातून आवर्तनास महिना होवूनही पाणी मिळत नसल्याने तालुक्यातील गावांवर अन्याय होत आहे.

आवर्तन सोडण्यात आले मात्र हे पाणी बेल्हा गावात वळून घेतले आहे. फळ बाग असणाऱ्या शेतकऱ्यांना शेत तळी भरण्यासाठी पाणी उचलण्याची गरज असताना उचलून दिले नाही.

वीज आणि पाणी मिळेल नाही, तर फळ बागा आणि शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश गंभीर होईल याबाबत याबाबत आमदार लंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचे काटे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24