अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नेवासे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सन २०१८-१९ व २०२० मधील खरीप व रब्बी हंगामातील पिकाचे विमा योजनेत सहभागी होऊन खरीप हंगाम २०१८-१९ ला दुष्काळी परिस्थिती असताना ३१ जुलै पर्यंत विमा भरला.
अशा कठीण परिस्थितीतही नैसर्गिक आपत्ती जोखीम म्हणून अद्याप मदत विमा कंपन्यांकडून झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
मागील वर्षी २०१९-२० मध्ये दोन्ही हंगामात तालुक्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे कपाशी, बाजरी,तुर सोयाबीन अदि पिकाचा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला
राज्य शासनाने कृषी विभागाला शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे कृषी व महसूल विभाग यांनी पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर केला.
पण मदत मिळाली नाही, तसेच सन २०१८-१९ च्या रब्बी हंगामातील हरबरा, ज्वारी,व इतर पिकाचा पिक विमा जाहीर झाला पण तोही मिळाला नाही.
तालुका कृषी विभागाने अशा शेतकऱ्यांची कागदपत्रे पुन्हा जमा केले तरीही मदत झाली नाही.व तालुका कृषी विभागाने तत्परता दाखवलेली नाही.