पावसाच्या विश्रांतीने शेतकऱ्यांची पिके सापडली अडचणीत; जोरदार पावसाची प्रतीक्षा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- यावर्षी पावसाचा चांगला अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु पावसाने मध्यंतरी जोरदार आगमन केले मात्र 10-12 दिवसांपूर्वी पावसाने ब्रेक घेतला आहे. धरण परिसरात पावसाने दिर्घ विश्रांती घेतली आहे.

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातही पावसाने दिर्घ विश्रांती घेतल्याने खरीप पिके अडचणीत आली आहेत. गेल्या 10-12 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक मंदावल्याने विसर्ग कमी कमी होत गेले.

1 जून पासून दारणातून 37 हजार 274 क्युसेक इतका विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने करण्यात आला. म्हणजेच 3222 दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

हे पाणी 3.2 टिएमसी इतके आहे. या धरणात भावली धरणातून 2596 क्युसेक एकूण पाणी दाखल झाले. म्हणजेच 224 दलघफू पाणी दाखल झाले. काल सकाळी भावलीतून 73 क्युसेकने पाणी दारणाच्या दिशेने वाहत होते.

दारणाच्या खाली वालदेवी धरणातून 241 क्युसेकने विसर्ग दारणा नदीत दाखल होत होता. नांदूर मधमेश्वर बंधार्‍यात नविन पाण्याची आवक मंदावल्याने या बंधार्‍यातून गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग काल दुपारनंतर बंद करण्यात आला.

त्यामुळे गोदावरीतील पाण्याचा प्रवाह थांबला आहे. दरम्यान नाशिक मधील सर्वच धरणांमध्ये पाण्याची आवक थांबली आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी कालच्या तारखेला धरणांची स्थिती चांगली आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला सर्व धरणांमध्ये एकूण 45.85 टक्के पाणी साठा होता. यावर्षी तो काल 61.73 टक्के इतका आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24