वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-वीज व पाणी हा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे सांगतानाच शेतीपंपांचे रोहित्र जळाल्याची तक्रार येताच २४ तासांत नवीन रोहित्र बसवावे.

महावितरणकडून हलगर्जीपणा झाला, तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी दिला. मिरी परिसरातील शेतकऱ्यांच्या बैठकीत राज्यमंत्री तनपुरे बोलत होते. राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनेचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

कृषिपंपांच्या विजेची सुमारे पन्नास ते साठ हजार कोटी थकबाकी असून महावितरणचा गाडा पुढे नेण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याची गरज अाहे. वीजबिलातून जे पैसे महावितरणकडे जमा होतील, त्यातून तीस टक्के रक्कम त्या गावाच्या परिसरातील रोहित्र व त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी, तर आणखी ३३ टक्के रक्कम जिल्ह्यातील महावितरणाच्या इतर कामासाठी खर्च केली

जाणार आहे. बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी, सहायक अभियंता भरत पवार, कनिष्ठ अभियंता हितेश ठाकूर, रमेश कुमार मिश्रा, राहुल गवळी, सरपंच अमोल वाघ, सुभाष गवळी, माणिकराव लोंढे, सरपंच अशोक दहातोंडे, जगनाथ लोंढे, सुधाकर वांढेकर, आदिनाथ सोलाट, अरुण बनकर,

शिवाजी मचे, सुरेश बर्फे, राजू शेख, भागिनाथ गवळी, जालिंदर वामन, भारत वांढेकर, बंडू झाडे, बापूसाहेब मिरपगार, सुरेश शिरसाठ, शिवाजी लवांडे, कारभारी गवळी, नामदेव सोलाट, बलभीम बनकर, नवनाथ निंबाळकर, बाळासाहेब घुले, शिवाजी जाधव, नवनाथ वांढेकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24