PM Kisan Yojana : देशातील अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम-किसान योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेचा 13 वा हप्ता पुढच्या महिन्यात सरकार जारी करू शकते. फेब्रुवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता जमा होईल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. अशातच जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी लागणाऱ्या नियम अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही.
जर तुम्हाला 13व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी लवकरात लवकर करा. जर तुम्ही या गोष्टी वेळेत केल्या नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही.
तुम्ही पीएम किसान पोर्टलला भेट देऊन तुम्ही तुमचे ई-केवायसी करू शकता. तसेच जर तुम्ही अजूनही तुमच्या भुलेखांची पडताळणी केली नसेल तरीही तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा 13 वा हप्ता जारी करू शकते.