अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- साखर कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीचा नफा हा सभासद, ऊस उत्पादकांच्या हक्काचा असून तो दिला जात नसल्याने तो मिळावा, या हक्कासाठी आमचे उपोषण होते.
मात्र सभासदांच्या विश्वासाला कारखाना पात्र नाही, असा आरोप करत व कायदेशीर मार्गाने लढून न्याय मिळवून देण्याची घोषणा करत गुरुवारी सायंकाळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांच्या उपोषणाची सांगता केली.
लोकनेते मारुतरावजी घुले ज्ञानेश्वर कारखान्याने उसाला प्रतिटन २८०० रुपये दराने भाव द्यावा या मागणीसाठी सकाळपासून माजी आमदार मुरकुटे हे प्रमुख कार्यकर्त्यांसह उपोषणास बसले होते. त्यांच्या उपोषणाची सांगता सायंकाळी झाली.
जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, अंकुश काळे, भाऊसाहेब फुलारी, जनार्दन जाधव आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह एक दिवशीय उपोषण करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनीही उपोषणस्थळी भेट दिली.
सुनील वाघ, रविकांत शेळके, कल्याणराव काळे, भाऊसाहेब फुलारी, विनायक मिसाळ, किसनराव यादव, पिंटू वाघडकर, येडू सोनवणे, संभाजी सोनवणे, देवेंद्र काळे, संतोष मिसाळ, बंडू आरगडे, मनोज पारखे,
विश्वास कर्जुले, कडुबा हाडोळे, देवेंद्र काळे, सुभाष पवार, आकाश देशमुख, प्रतीक शेजुळ, आदिनाथ पठारे, महेश निकम, अशोक पाटोळे, विष्णू गायकवाड, वसंतराव उकिर्डे, फिरोज शेख, तुळशीराम शिंदे,
अनिल गायकवाड, तुळशीराम झगरे, किशोर मुरकुटे, राजू शेख, आजिनाथ काळे, कल्याण महाराज पवार, शरद पोटे, लक्ष्मण काशीद, पोपट शेकडे, जिल्हा उपाध्यक्ष नजराना सय्यद, विश्वासराव काळे आदींचा आंदोलकांत समावेश होता.