अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- क्रिकेट विश्वातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने क्रिकेटला निरोप दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आधीच अलविदा म्हणणारा मलिंगा आता लीग क्रिकेट खेळणार नाही.
मलिंगाने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मलिंगाने म्हटले, आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला मी निरोप देत आहे. माझ्या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्यांचे आभार.
आता मी येत्या काही वर्षांमध्ये माझे अनुभव युवा क्रिकेटपटूंसोबत शेअर करेन. क्रिकेट कारकीर्द… मलिंगा श्रीलंकेसाठी 30 कसोटी सामने, 226 एकदिवसीय आणि 84 टी -20 सामने खेळला आहे, ज्यात त्याने 546 विकेट्स घेतल्या आहेत.
मलिंगा शेवटचा टी -20 सामना मार्च 2020 मध्ये पल्लेकेले इथं वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. मलिंगाने 2011 मध्ये कसोटी आणि 2019 मध्ये वनडे फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
मलिंगा टी -20 मध्ये 100 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. टी-20 मध्ये त्याने 5 वेळा 5 विकेट आणि 10 वेळा 4 विकेट घेतल्या आहेत.