अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- राहुरी पोलिस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात असलेल्या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी मदत करणारे पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव यांना कायमस्वरूपी निलंबित करावे.
या मागणीसाठी राहुरी येथील गोरक्षनाथ मेहेत्रे यांनी आज दिनांक २२ जुलै पासून तहसिल कार्यलयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
दिपाली गोरक्षनाथ मेहेत्रे हिने दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी पोलिसांत फिर्यादीवरून आरोपी प्रमोद वसंत शिंदे, प्रसाद वसंत शिंदे, शफिक अब्दूल शेख आदी आरोपीं विरोधात विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच आर्म ॲक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
राहुरी पोलिस ठाण्यातील तत्कालीन तपासी अधिकारी व आताचे उप निरीक्षक तुषार धाकराव यांनी कोणताही तपास केला नाही.
तसेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास टाळाटाळ चालवीली आहे. पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक तुषार धाकराव यांचेकडुन सदर तपास काढून घ्यावा.
तसेच त्यांना निलंबित करून कडक कारवाई करावी यासाठी मेहत्रे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.