अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  शेतीच्या वादातून लक्ष्मण दादा लोणारे वय ७१ वर्ष (रा. कारेगाव ता. नेवासे) या वृदधाच्या खून प्रकरणी कुकाणे पोलिसांनी त्यांची मुले भाऊसाहेब लक्ष्मण लोणारे व अशोक लक्ष्मण लोणारे (दोन्ही रा. रांजणगाव ता. नेवासे) या मुलांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी सावत्र आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना रांजणगाव शिवारात घडली. लक्ष्मण दादा लोणारे हे झोपेतून उठुन प्रार्तविधीसाठी शेतात गेले होते.

बराच वेळ होऊनही ते परतले नाही. म्हणून त्यांना शोधण्यासाठी शेताकडे जात असताना गेल्यावर सावत्र मुले भाऊसाहेब व अशोक दोघे रा. रांजणगाव ता. नेवासे हे मक्‍याचे शेतातून ऊसाकडे पळताना दिसले.

मी त्या दिशेने मकाचे शेतात जावून पाहिले असता मला पती जखमी अवस्थेत शेतात पडले होते.