दोन मुलांच्या बापाने अविवाहित तरुणीला पळवले ! जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील घटना…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- दोन मुलांच्या बापाने अविवाहित तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली. या घटनेबाबत मुलीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अन्सार पठाण याच्या विरूद्ध राहुरी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री ही घटना घडली. अविवाहित तरुणीच्या घराजवळच अन्सार पठाण याचे घर आहे. दोन मुलांचा बाप असलेल्या अन्सार हा तरूणी बरोबर बोलताना पालकांनी घटनेपूर्वी बघितले होते.

पहाटे मुलीच्या आईला जाग आल्याने घरातुन मुलगी गायब असल्याचे दिसुन आले. नातेवाईकांनी शोध घेतला मात्र तो व्यर्थ ठरला.

यावेळी अन्सार पठाण हा देखील घरातून गायब असल्याची माहिती मिळाल्याने नातेवाईकांनी मुलीला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली.

पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत. आमच्या मुलीचा तातडीने शोध लावावा, अन्यथा राहुरी पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा इशारा मुलीच्या पालकांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office