देशात दिवसाला ५६०० मृत्यू होण्याची भीती !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-भारतात कोरोना मे महिन्यात थैमान घालण्याची शक्यता आहे. परिणामी, देशभरात दररोज कोरोनामुळे सुमारे ५६०० जणांचा मृत्यू होऊ शकतो,

असा धक्कादायक दावा अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इ्स्टिटट्यूट फॉर हेल्थ मेटरिक्स ॲण्ड एव्हॅल्यूशनच्या (आयएचएमई) वतीने करण्यात आलेल्या संशोधनात करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन विद्यापीठाच्या आयएचएमईच्या संशोधनाचा अहवाल १५ एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आला. यामध्ये भारतातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.

त्यानुसार भारतात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात नवीन कोरोनाबाधित आढळण्याच्या प्रमाणात ७१ टक्के वाढ झाली आहे. यामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५५ टक्क्यांनी वाढले आहे.

सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यानच्या काळात भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, आता त्यात वाढ होताना दिसत आहे. दररोज कोरोनाबाधित आढळण्याचा दर मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या एप्रिल महिन्यात दुप्पट आहे.

भारतात आगामी दिवसात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची शक्यता आहे. १० मेपर्यंत भारतातील दररोजची कोरोना बळींची संख्या ५६०० इतकी होण्याची शक्यता आहे, तर १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या काळात अतिरिक्त ३,२९,००० कोरोनाबाधितांचा मृत्यू होऊन

जुलैअखेरीस बळींची संख्या ६,६५,००० इतकी होईल, असा अंदाजदेखील या अहवालात वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, भारतात कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर देण्याची गरज आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24