14 फेब्रुवारी ! प्रेमाचा दिवस….जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- फेब्रुवारी महिन्याची सुरूवात झाली तरूण-तरूणींना ‘व्हेलेंटाईन डे’ चे वेध लागायला सुरूवात होते. 7 फेब्रुवारीला रोझ डे पासून सुरू होणारा हा रोमॅन्टिक आठवडा 14 फेब्रुवारीला स्पेशल होतो.

दरवर्षी 14 फेब्रुवारी दिवशी जगभरात ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला जातो. प्रेमी तरूण तरूणी या आठवड्याभरात प्रत्येक एक दिवस साजरा करताना त्याच्या सेलिब्रेशनसोबतच एकमेकांना भेटवस्तू, शुभेच्छा देऊन व्हेलेंटाईन वीक मधील प्रत्येक दिवस खास करतात.

मग जगभरात तरूणाईत क्रेझ असलेल्या ‘व्हेलेंटाईन डे’ची नेमकी कशी सुरूवात झाली हे जाणून घेऊ… जाणून घ्या इतिहास… तिसऱ्या शतकात रोम देशात एक क्रुर सम्राट होता.

जो प्रेम करणाऱ्या युगुलांवर अत्याचार करत असे. मात्र त्याच्या अत्याचाराला न जुमानता व्हेलेंटाईन नावाच्या एका संताने प्रेमाचा संदेश दिला.

सम्राट क्लाऊडियसला निषेध करत संत व्हेलेंटाईन यांनी जोडप्यांचं लग्न लावलं. त्याच्या या कृत्यानिमित्त व्हेलेंटाईनला जेलमध्ये टाकण्यात आले आणि 14 फेब्रुवारी 270 साली त्याला फासावर लटकवण्यात आले.

संत व्हेलेंटाईन यांनी प्रेमासाठी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला जातो.

प्रेमी युगूल या दिवशी एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात. एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असणार्‍या व्यक्ती आपल्या पार्टनरचा दिवस खास करण्यासाठी एकमेकांना शुभेच्छा, गिफ्ट्स देतात.