अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला होता. जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटी जन्य पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले होते.

यातच केलवड मध्ये चार दिवसांत १० शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडली. नानासाहेब राऊत यांच्या ३, संदीप गमे यांची १, किशोर गमे यांच्या २, मच्छिंद्र गमे यांची १, लक्ष्मण घोरपडे यांची १, अण्णासाहेब घोरपडे यांची १,

अशोक घोरपडे यांची १, रमा सोनवणे यांच्या २, बाळासाहेब जटाड यांची १, वसंत ठोंबरे यांची २ जनावरे दगावली आहेत. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी गावात पाहणी करत जनावरांचे रक्ताचे नमुने घेतले.

रविवारी दगावलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना शासकीय सर्टिफिकेट देण्यात येणार असून,

नुकसान भरपाईविषयी प्रयत्न केले जातील, अशी माहिती सहायक आयुक्त डॉ. पी. वाय. ओहळ यांनी दिली. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची टीम केलवड गावात पाठविण्यात आली आहे.

रक्ताचे नमुने तपासणीस पाठविले आहेत. खुरकुत, घटसर्प व गोचिड ताप असल्याचे लक्षात येत आहेत. विकत घेतलेल्या जनावरांना लस देऊन १५ ते २१ दिवसांनंतर गोठ्यात घ्यावीत, त्यामुळे प्रादुर्भाव कमी होईल. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.