निवडणुकीत विरोधात प्रचार का केला या कारणावरून दोन गटातील हाणामारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-मोहा येथे रस्त्याच्या कामाची तक्रार का केली व निवडणुकीत विरोधात प्रचार का केला या कारणावरून दोन गटातील हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले.

या प्रकरणी दोन्ही गटाकडून दाखल झालेल्या परस्पर विरोधीतक्रारीवरून पोलिसांनी २९जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संदिप ज्ञानदेव डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी शिवाजी त्रिंबक डोंगरे, वामन आत्माराम डोंगरे, प्रदिप आत्माराम डोंगरे, मारुती रघुनाथ डोंगरे, बाळु रघुनाथ डोंगरे,

नवनाथ बाळु डोंगरे, रमेश मारुती डोंगरे, उमेश मारुती डोंगरे, बाबासाहेब वामन बांगर, केदार वामन बांगर, हर्षल बाळासाहेब डोंगरे, देविदास महादेव गर्जे, ज्ञानेश्वर महादेव गर्जे, मारुती गोविंद बेलेकर, वसंत दत्तात्रय झेंडे, छाया आत्माराम डोंगरे, स्वाती वामन डोंगरे, उर्मिला प्रदिप डोंगरे, मनिषा मारुती डोंगरे,

महादेव प्रल्हाद गर्जे व मुक्ताबाई महादेव गर्जे (सर्व रा.मोहा) अशा १९ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून रहात्या घरासमोर येऊन व सोमनाथ डोंगरे यास म्हणाले की, तुम्ही आम्ही करीत असलेल्या रोडच्या कामाच्या विरोधात जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार अर्ज का केला असे म्हणून आरोपी यांनी लाकडी दांडक्याने व व दगडाने मारहाण केली.

तसेच तुम्ही तक्रार अर्ज मागे घेतला नाही तर तुमचा काटा काढतो असे म्हणून दम दिला. तर दुसऱ्या गटाच्या वामन आत्माराम डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, आरोपी संदिप ज्ञानदेव डोंगरे, सदाशिव ज्ञानदेव डोंगरे, ज्ञानदेव नामदेव डोंगरे, (रा.मोहा), सोमनाथ श्रीधर डोंगरे,

अशोक रामचंद्र दहीफळे, अभिनंदन सुरेश डोंगरे, रा.हापटवाडी, बाळु महादेव घुमरे (रा. रेडेवाडी), व लहुराज दिवीचंद डोंगरे (रा.हापटवाडी) अशा एकुण आठ जणांनी फिर्यादी व साक्षीदार यांनी घरासमोर येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तू ग्रामपंचायत निवडणुकीत देवीचंद वामन डोंगरे यांच्या विरोधात काम का केले असे म्हणुन मारहाण केली.

तसेच या ठिकाणी काही जण सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. या घटनेत पाच जण जखमी झाले असून २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एस.व्ही.लाटे हे करत आहेत

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24