अहमदनगर शहरातील ‘त्या’ मोठ्या हाॅटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- शहरातील रस्त्याचे विनापरवाना खोदकाम करणार्या हाॅटेल चालकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल रासकोंडा (पूर्ण नाव माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील नगर- पुणे हा डांबरी रस्ता हाॅटेल रेडीयंस जवळ खोदला असल्याची माहिती २१ जूनला ठेकेदार चंद्रशेखर म्हस्के यांनी अभियंता निंबाळकर यांना दिली.

अभियंता निंबाळकर व बांधकाम विभागाचे मुकादम अशोक बिडवे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता सहा मीटर रस्ता खोदलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. याबाबत रासकोंडा यांना विचारणा केली असता

टेलीफोनची केबल जोडण्यासाठी रस्ता खोदला असल्याचे त्याने निंबाळकर यांना सांगितले. सदर प्रकरणी निंबाळकर यांनी मनपा आयुक्त शंकर गोरेयांना सविस्तर अहवाल सादर केला अखेर निंबाळकर यांनी रासकोंडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24