जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 11 रुग्णांचा बळी गेला असून, या दुर्घटनेस जिल्हा शल्यचिकित्सकास जबाबदार दोषी धरुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे.
परिचारिका व इतर वैद्यकिय अधिकार्यांवर कारवाई करुन जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठिशी घातले जात असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.
मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, पवन भिंगारदिवे, नईम शेख, ऋषी विधाते, इरफान शेख, आजीम खान, जावेद सय्यद, जमीर इनामदार, विजय शिरसाठ, संतोष पाडळे, शिवम साठे आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शॉटसर्किटने आग लागली. शासकीय कार्यालयाचे वायरिंगवर लक्ष ठेवणारे बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने वायरिंगची दुरुस्ती करून घेणे कामी ६ सप्टेंबर रोजी पत्र दिले होते. कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.