अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- स्वतः विवाहित असताना देखील श्रीरामपूर शहरात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून गर्भवती ठेवले.
त्यानंतर गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम उर्फ राजू पोपट वायकर असे या गुन्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणीचे पोलीस कर्मचार्यांशी एका गुन्ह्याच्या तपासाच्या निमित्ताने ओळख झाली. सदर तरुणी पारनेर तालुक्यातील पानोली परिसरात राहते.
तरुणीस २०१९ पासून लग्नाचे अमिष दाखवून श्रीरामपूर येथे फ्लॅटवर तसेच बाभळेश्वर व शिर्डी येथे लॉजवर नेवून वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. त्यातून ती तरुणी गर्भवती राहिली.
गर्भवती असल्याचे वायकर यास कळाले त्यावेळी त्याने गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून गर्भपात केला. तसेच त्याचे लग्न झालेले असून त्यास अपत्य असल्याची माहिती लपवून ठेवून फसवणूक केली.
त्यामुळे पिडीत तरुणी आरोपीच्या मुळगावी नेवासा तालुक्यातील भेंडा येथे त्याचे घरी गेली. यावेळी तरुणीला वायकर याच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करुन मारहाण केली.
तर आरोपी तुळशीराम उर्फ राजू वायकर म्हणाला, तुझा माझा काहीएक संबंध नाही. तु परत येथे दिसली तर मारुन टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात सदर पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.