अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- नवविवाहितेने फ्लॅट घेण्यासाठी माहेरघरून ५ लाख रुपये आणावेत तर तुला स्वयंपाक नीट येत नाही, तू वडिलांकडून दागिने घेऊन ये, असे म्हणून अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ दमदाटी करुन
शारीरिक व मानसिक छळ केल्याचे काैटुंबिक हिंसाचाराचे दोन गुन्हे टिटवाळा (जि. ठाणे) व चाकण (पुणे) येथील कुटुंबियांविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले.
रोहिणी डोंगरे यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी विवाहितेचे लग्न झाल्यानंतर सासरी बिल्डिंग नंबर ७/१०३ फेज दोन हरिओम व्हॅली ए विंग गणेश मंदिर रोड, टीटवाळा येथे नांदत होती.
लग्न झाल्यानंतर दोन महिन्यातच पती नीलेश सुदाम डोंगरे यांनी फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपये घेऊन ये असे म्हणून व अशोक डोंगरे, जाव दीपाली डोंगरे यांनी तुला स्वयंपाक नीट येत नाही असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली, सासू ताराबाई डोंगरे, सासरे सुदाम डोंगरे यांनी फिर्यादीस मारहाण केली.
याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत आम्रपाली इथापे, रा. सावरगावपाट या विवाहितेने फिर्याद दाखल केली.
त्यात म्हटले आहे की, लग्नानंतर मे २०१४ पासून दोन ते जून २०२० रोजी पर्यंत सासू चंद्रभागा इथापे, सासरे दत्तात्रय इथापे,रवींद्र इथापे, पती संतोष दत्तात्रय इथापे यांनी पैशांसाठी छळ केला.