विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सुनेला सासरी होणार छळ आदी घटनांची पोलीस ठाण्यात होणारी नोंद पाहता याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे झाले आहे. नुकतेच संगमनेर मध्ये अशीच नवविवाहितेची छळ प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. करोना काळात लग्न झाल्याने वाचलेले दोन लाख रुपये तुझ्या आईकडून नवीन व्यवसाय करण्यासाठी घेऊन ये,

असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून त्यावरून वैजापूर येथील सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साक्षी ज्ञानेश्वर बनसोड (वय 19) (रा. इंदिरानगर संगमनेर) हिने फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी साक्षी हिने म्हंटले आहे कि, मी महिनाभरापासून आई स्वाती अनिल मुंडलिक रा. इंदिरानगर, संगमनेर येथे राहते. माझे वडील 12 वर्षांपासून आमचेपासून वेगळे राहतात. माझे लग्न 14 जून 2020 रोजी वैजापूर येथील ज्ञानेश्वर श्रीराम बनसोड यांचेसोबत संत नरहरी महाराज मंदिर श्रीरामपूर येथे झाले होते.

सासरी नांदत असताना काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी तुझ्या आईने करोना काळात चांगले लग्न करून दिले नाही. त्यामुळे तिचे पैसे वाचले आहेत. त्यामुळे तिच्याकडून व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत. त्यासाठी मारहाण करून उपाशीपोटी ठेवून छळ करून घराबाहेर काढून दिले.

माझा नवरा ज्ञानेश्वर श्रीराम बनसोड याने दोन लाख रुपये न दिल्यास मी आत्महत्या करीन अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून संगमनेर पोलिसांनी नवरा ज्ञानेश्वर श्रीराम बनसोड, सासू रेखा श्रीराम बनसोड, सासरा श्रीराम कचरुशेठ बनसोड, दीर रोहीत श्रीराम बनसोड (सर्व रा. वैजापूर) यांचेवर हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24