अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- लग्न समारंभात मानपान दिले नाही तसेच माहेरहून एक लाख रूपये आणावेत, या मागणीसाठी वैशाली घुगरे हिचा सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पती संदीप घुगरे, सासरे नामदेव घुगरे, सासू कांताबाई घुगरे, मामासासरे नामदेव पंडित (रा. वांबोरी) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वैशालीचा विवाह वांबोरी येथील संदीप नामदेव घुगरे यांच्याबरोबर सुमारे तीन वर्षांपूर्वी झाला होता. वैशाली हिला लग्नानंतर एक वर्ष व्यवस्थित नांदविण्यात आले. मात्र, त्यानंतर वेळोवेळी तिला सासरी विवाह समारंभात मानपान दिले नाही.
तसेच तिने माहेरहून एक लाख रूपये आणावेत, या मागणीसाठी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. वैशाली संदीप घुगरे हिच्या फिर्यादीवरून चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आव्हाड करत आहेत.