प्राथमिक आरोग्य केंद्रातील ‘त्या’ महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- जवळा येथील रहिवासी असलेल्या डॉ. तेजश्री पोपटराव ढवळे यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढवळे यांनी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदावर काम करत असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्र अळकुटी याठिकाणी देखिल समुदाय अधिकारी म्हणून काम करून 40 हजार रुपयांचे मानधन घेतले.

अखेर एकाचवेळी दोन जिल्ह्यांत सेवा करून मानधन घेतल्याप्रकरणी व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ढवळे या महिला डॉक्टरविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एकाचवेळी दोन ठिकाणी शासकीय नोकरी करून दोन्ही ठिकाणी मानधन घेऊन शासनाची फसवणूक केली आहे.

यासंबंधीची फिर्याद डॉ. संदीप साहेबराव देठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. ढवळे यांनी 3 जून 2021 ते 30 जून 2021 रोजी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवंडी व 1 जून 2021 रोजी ते 30 जून 2021 रोजी दरम्यान उपकेंद्र वडझिरे प्राथमिक आरोग्य केंद्र अळकुटी असे दोन ठिकाणी एकाच वेळी वैद्यकीय अधिकारी या पदावर शासकीय कर्तव्य बजावून शासनाकडून 40 हजार रुपये मानधन घेतले.